दरोडयाच्या गुन्हयातील सुमारे तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
दरोडयाच्या गुन्हयातील सुमारे तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक 16/1/2021 रोजी LCB टिमला यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०१७ भादंवि क. ३९५, ३५३ प्रमाणे दरोडयाच्या गुन्हयातील तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे नाना हरिदास जाधव वय 30 वर्ष धंदा शेती रा व्याहळी ता इंदापूर जिल्हा पुणे हा त्याचे राहते गावात येणार असल्याची बातमी मिळालेवरून सदर ठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो स ई शिवाजी ननावरे,पोहवा. अनिल काळे,पोहवा. रविराज कोकरे,पो हवा ज्ञानेश्वर क्षिरसागर,पो हवा काशीनाथ राजपुरे,पोना अभिजित एकशिंगे,पोना. विजय कांचन,पोकॉ धिरज जाधव यांनी केलेली आहे.