दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये बाभुळगावच्या अक्षय देवकर सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अध्याप आरोपी मोकाटच... अत्याचारग्रस्त कुटुंब भयभीत

दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये बाभुळगावच्या अक्षय देवकर सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अध्याप आरोपी मोकाटच…
अत्याचारग्रस्त कुटुंब भयभीत
इंदापूर; प्रतिनिधी
सांडपाण्याची सोय लावा असे सांगणाऱ्या महिलेस जातीयवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याच्या आरोपावरुन बाभुळगाव ( ता.इंदापूर) येथील तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रमेश देवकर, रिंकू अक्षय देवकर,अजिंक्य रमेश देवकर (सर्व रा.बाभुळगाव, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. काविराबाई दत्तात्रय कांबळे ( वय ५० वर्षे,बाभुळगाव,ता. इंदापूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.
कांबळे व देवकर हे एकमेकांचे शेजारी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून देवकर यांच्या घरातील सांडपाणी कांबळे यांच्या घरासमोर येत आहे. त्याची सोय लावा असे कांबळे सातत्याने देवकर कुटुंबाला सांगत आहेत. परंतू काही उपाययोजना देवकर कुटुंब करत नाहीत.९ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता घरासमोर सांडपाणी आल्यानंतर कांबळे यांनी त्याची सोय करावी असे सांगितले. याचा राग धरून कांबळे चर्मकार समाजाच्या आहेत हे माहिती असताना देखील अक्षय देवकर याने त्यांचा जातीयवाचक उल्लेख तुला गावात राहू देणार नाही. तू आमचे नादी लागू नको. जगायला आलाय तर नीट राहा असे म्हणत तक्रारदार यांना थप्पड मारली. त्याची पत्नी रिंकू देवकर व भाऊ अजिंक्य देवकर यांनी ही शिवीगाळ करुन जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या आरोपांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा मारहाण होण्याची भीती…
आमचे कांबळे कुटुंब भुमीहीन असून मिळेल तेथे शेतमजुरी तसेच इतर कामे करून गुजरान करत असतो. आमचे कुटुंब बाभूळगाव येथील हाजारच्या वर लोकसंख्या असलेल्या देवकर वस्ती येथे राहत आहोत. सदर वस्तीत आमचे कुटुंब मध्यभागी रहावयास आहे. आमचे घराच्या आसपास आरोपी देवकर व त्याचे नातलग बहूसंख्य प्रमाणात रहात आहेत. त्यामुळे तक्रार केल्याच्या रागातून घरी येता-जाता मारहाण होण्याची भीती सतावत आहे. संबंधित आरोपींना अध्यापपर्यंत अटक झाली नाही. त्यामुळे या बातमीच्या माध्यमातून तात्पुरते का होईना इंदापूर पोलिसांकडून पोलिस संरक्षण मिळावे अशी अपेक्षा असल्याचे तक्रारदार यांचा मुलगा धिरज कांबळे यांनी सांगितले.