दहावीची परीक्षा रद्द होण्यावर अखेर न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब, याचिका मागे घेतल्याने निकाली
दहावी परीक्षेसंदर्भातील जनहित याचिका प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतल्यानं निकाली निघाली आहे.
दहावीची परीक्षा रद्द होण्यावर अखेर न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब, याचिका मागे घेतल्याने निकाली
दहावी परीक्षेसंदर्भातील जनहित याचिका प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतल्यानं निकाली निघाली आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा रद्द होण्यावर अखेर न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब झालं आहे. कारण दहावीची परीक्षा रद्द करण्याविरोधात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली. हायकोर्टाने धनंजय कुलकर्णींवर प्रश्नांची सरबत्ती करत, मुलांच्या आरोग्यावरुन धारेवर धरलं. त्यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी आपली याचिका मागे घेतल्याने, ही याचिका आता निकाली निघाली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबादारी घेणार का?
पुण्यातील प्रा.धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात दहावी परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका मागे घेतली आहे. मुंबई हायकोर्टानं आज झालेल्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का?, असे प्रश्न विचारले. याचिका करणारे धनंजय कुलकर्णी कोण आहेत ? त्यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान काय ? कोर्टान याचिककर्त्यांच्या वकिलांना विचारणा केली.
हायकोर्टाने CET चा मुद्दा महत्त्वाचा मानला
11 वी परीक्षेसाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना CET ची परीक्षा होणार आहे. त्यावेळी सर्व विद्यार्थी एका स्तरावर येतील. सीईटीमध्ये भेदभाव होणार नाही, अस मत कोर्टाने नोंदवलं. याच प्रमाणे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मूल्यांकनाद्वारे पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जर याचिका कर्ते यांना काही संशय वाटत असल्यास , कमतरता वाटत असल्यास याचिकाकर्ते नवीन याचिका करू शकतात अस, कोर्टाने म्हटलं आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भंयकर
दहावीच्या परीक्षा रद्द करणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीला मुख्य न्यायमूर्ती दीपाकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुरूवात झाली. याचिका करणारे धनंजय कुलकर्णी कोण आहेत ? त्यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान काय ? कोर्टानं याचिककर्त्यांच्या वकिलांना विचारणा केली. धनंजय कुलकर्णी हे माजी प्राध्यापक आहेत अशी माहिती याचिककर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी कोर्टात दिली.
दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तुम्ही आव्हान दिलय पण परीक्षा घेतल्याच आणि मुलांना बाधा झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची ?अशी विचारणा हायकोर्टानं केली. याचिकाकर्ते याची जबाबदारी स्वीकारण्याच्या पदावर नाहीत याचिकाकर्ते कुलकर्णीच्या वतीने वारुंजीकर यांनी ही माहिती दिली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे.त्यामुळे अनेक राज्ये परिक्षा रद्द करत आहेत तरी हा हट्ट का ? अशी विचारणा कोर्टानं केली.
याचिका दाखल केल्यानंतर धमक्या
प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी दहावी परीक्षेसंदर्भातील याचिका दाखल केल्यानंतर त्यांना धमक्या आल्याची माहिती अॅड. उदय वारुंजीकर यांनी मुंबई हायकोर्टाला दिली. राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयात काही त्रुटी असतील तर नव्यानं याचिका दाखल करा, असं कोर्टानं सांगितले.