दहावी निकाल जाहीर; यंदाही निकालात मुलींचीच डंका; कोणाचा किती टक्के निकाल? बघा
ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत
दहावी निकाल जाहीर; यंदाही निकालात मुलींचीच डंका; कोणाचा किती टक्के निकाल? बघा
ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत
मुंबई, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल हा जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 99.27 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 95.90 एवढा लागला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल हा विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. यामध्ये दहावी आणि अकरावीचे गुण मार्क्स देण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. तरीही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. मात्र यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.
राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये –
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ५२,३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.२७ अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे. एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
विभागानुसार टक्केवारी – यंदाच्या निकालात पुणे विभागाचा निकाल हा 96.96% टक्के,नागपूर विभागाचा निकाल हा 97% टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल हा 96.33% टक्के, मुंबई विभागाचा निकाल हा 96.94% टक्के, कोल्हापूर विभागाचा 98.50% टक्के, अमरावती विभागाचा 96.81 % टक्के,नाशिक विभागाचा 95.90% टक्के, लातूर विभागाचा 97.27% टक्के, कोकण विभागाच 99.27% टक्के निकाल लागला आहे.