स्थानिक

दाम्पत्याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली बॅग मूळ मालकाला परत मिळाली

सदरची पर्स त्यामध्ये एकूण 1,40,350,/- रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला

दाम्पत्याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली बॅग मूळ मालकाला परत मिळाली

सदरची पर्स त्यामध्ये एकूण 1,40,350,/- रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला

बारामती वार्तापत्र

आज रोजी माधुरी किसन जगदाळे राहणार चिरेखाण वाडी मूर्ती तालुका बारामती जिल्हा पुणे. या आज रोजी कोराळे बुद्रुक या ठिकाणी कपडे खरेदी करुन नंतर काही किराणामाल घेऊन वडगाव येथे गेले दरम्यान वडगाव येथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण एक्टिवा गाडी च्या मध्ये ठेवलेली पर्स प्रवासादरम्यान पडून कुठेतरी हरवली आहे.

याच दरम्यान श्री विठ्ठल सुरेश शिंदे व प्रियंका विठ्ठल शिंदे राहणार जामदार रोड मुक्ती टाऊनशिप बारामती हे दांपत्य आपल्या मुलांसह बारामतीकडे येत असताना त्यांना पांढरे वस्ती चोपडज जवळ सदरची पर्स सापडली ते बारामती कडे येत असल्यामुळे त्यांनी पुढे येऊन अगदी प्रामाणिकपणे सदरची बॅग बारामती शहर पोलीस स्टेशन येथे येऊन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक यांचे ताब्यात दिली त्यांच्या या प्रमाणामुळे सदरची पर्स त्यामध्ये मंगळसूत्र , नेकलेस, कानातील सोन्याचे, दोन मोबाईल फोन व काही कॅश असा एकूण 1,40,350,/- रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला या घटनेतून शिंदे दांपत्याने स्वतःच्या मुलांसमोर अतिउच्च प्रामाणिकपणाचे दर्शन तर घडविले त्याच सोबत समाजाला एक चांगला आदर्श दाखवून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!