दिनांक 28 रोजी बारामतीमध्ये 43 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 675 वर गेली आहे.

दिनांक 28 रोजी बारामतीमध्ये 43 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 675 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात काल घेतलेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये बारामती तालुक्यातील 43 जण कोरोना बाधित आढळले असून इंदापूर तालुक्यात ही नव्याने सात जण कोरोना बाधित आढळले आहेत.
शासकीय प्रयोगशाळेतील.
आलेल्या पत्त्यानुसार गवारे फाटा मळद येथील तिघेजण असून यामध्ये 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 12 वर्षीय युवक रुग्णाचा समावेश आहे. सोनवडी सुपे येथे काल दिवसभरात चार जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये 55 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक व 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. बारामतीतील पंचायत समिती येथे ही एक कोरोना रूग्ण आढळला असून 27 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील कारखेल येथील 30 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. बारामती शहरातील अमराई भागातील 50 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. कोऱ्हाळे बुद्रुक येथील 43 वर्षीय महिला, कसबा बारामती येथील 33 वर्षे पुरुष, माळेगाव येथील 25 वर्षीय पुरूष, बुरुड गल्ली येथील 80 वर्षीय पुरुष, पेन्सिल चौक येथील 40 वर्षीय पुरुष, डायनामिक्स कॉलनी येथील 29 वर्षीय पुरुष, आमराई येथील 25 वर्षीय महिला, कसबा येथील 33 वर्षीय पुरुष, कल्याणी नगर येथील 30 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 25 वर्षीय महिला व 47 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर येथील 40 वर्षीय महिला, निर्मिती विहार येथील 34 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 60 वर्षीय पुरुष व वडगाव निंबाळकर येथील 28 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर एंटीजन तपासणीमध्ये ते 14 जण कोरोना बाधित आढळलेले आहेत.
इंदापूर तालुक्यातील सणसर मध्ये तीन रुग्ण; भिगवण मध्ये तीन रुग्ण.
बारामती येथील तपासणी मध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर मध्ये तीन रुग्ण आढळले असून सणसर येथील 39 फाटा येथे 65 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. तर सणसर गावातील दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या व्यवसायिकाच्या कुटुंबातील वीस वर्षीय महिला व 45 वर्षीय महिलेसही कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील भिगवण येथे 31 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला व 41 वर्षे पुरुष रूग्णास कोरोनाची लागण झाली आहे. निमसाखर येथील 32 वर्षे पुरुष रूग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.