दिलासादायक ! दोन महिने लढले, पण लसीकरण केंद्र पदरात पाडून घेतले तेव्हाच ते दोघे थांबले..
अखेर बारामतीत दुसरे लसीकरण केंद्र झाले मंजूर !

दिलासादायक ! दोन महिने लढले, पण लसीकरण केंद्र पदरात पाडून घेतले तेव्हाच ते दोघे थांबले..
अखेर बारामतीत दुसरे लसीकरण केंद्र झाले मंजूर !
बारामती वार्तापत्र
बारामतीत गेली दोन महिन्यापासून लसीकरण केंद्रासाठी झगडणार्या नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते मनसेचे नेते एडवोकेट सुधीर पाटकर यांच्या लढाईला यश मिळाले असून प्रांताधिकार्यांनी बारामतीतील दुसरे लसीकरण केंद्र सिद्धेश्वर गल्ली येथे मंजूर केले.
या लसीकरण केंद्रामुळे शहरातील नागरिकांना दोन पर्याय उपलब्ध झाले असून गर्दी टाळण्याकरता हे केंद्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या केंद्राचे उद्घाटन करताना सुनील सस्ते यांनी कोणतेही राजकारण आडवे आणणार नाही, हे दाखवून दिले. राष्ट्रवादीचे युवा नेते अमजद बागवान यांना बरोबर घेत या लसीकरण केंद्राची सुरुवात केली. आता गेली दोन महिने त्यांच्या या लढ्यामध्ये मात्र राजकारण आडवे येत होते. मात्र त्यांनी केंद्राची सुरुवात करताना राजकारण मध्ये आणणार नाही याचे उदाहरण घालून देत एका सतत आडव्या येणाऱ्या स्थानिक नेत्याला सणसणीत चपराक दिली.
गेली दोन महिन्यापासून सुनील सस्ते हे बारामती शहरात एकापेक्षा अधिक लसीकरण केंद्राची आवश्यकता आहे वाटल्यास 40 प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावीत अशी मागणी करत होते परंतु प्रशासनाची देखील अप्रत्यक्ष संमती होती परंतु कोणी तरी यामध्ये राजकारण करीत असून हे केंद्र होऊ देत नसल्याची प्रतिक्रिया सुनील सस्ते हे देत होते सुनील सस्ते यांनी आपला पाठपुरावा कायम चालू ठेवला आणि बारामतीतील सामान्य नागरिकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी मी हे करत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले.
मनसेचे नेते सुधीर पाटसकर व सुनील सस्ते यांनी प्रशासनाशी सतत संवाद चालू ठेवला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अन्यत्र लसीकरण केंद्राची का आवश्यकता आहे हे पटवून दिले. त्यासाठी त्यांनी आंदोलनाची पण तयारी केली, मात्र त्यानंतरही हे लसीकरण केंद्र मंजूर झाले नव्हते. दोन दिवसापूर्वी बारामती लॉकडाऊन च्या निर्णयाच्या संदर्भात झालेल्या बैठकीत मोठा गदारोळ उडाला व बारामती शहरातील एका स्थानिक नेत्याच्या विरोधात साऱ्या शहरवासीयांनी व तिथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र नाराजीचा सूर मिसळला यामध्ये राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी सहभागी होते त्यामुळे एकंदरीत सार्वत्रिक नाराजीचा सूर पाहता प्रशासनाने तातडीने दुसऱ्या लसीकरण केंद्राची मागणी मान्य केली.
थोडक्यात दोन महिने लढले पण केंद्र पदरात पाडून घेतले तेव्हाच सुनील सस्ते थांबले
मात्र लसीकरण केंद्र मिळाल्यानंतर त्यांनी इतरांनी राजकारण केले असले तरी मी अजिबात राजकारण करणार नाही पहिल्या दिवसापासून सामान्य नागरिकांसाठी माझा संघर्ष होता आणि आताही सामान्य नागरिकांसाठी संघर्ष आहे मी श्रेया ची लढाई लढत नाही असे सस्ते यांनी स्पष्ट केले.
तर एडवोकेट सुधीर पाटसकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अतिशय चांगले काम करतात, मात्र त्यांना येथून पुरवली जाणारी माहिती एककल्ली लोकांकडून पुरवली जात आहे. त्यामुळे अजितदादांनी ऐकून घेताना इतरांकडूनही त्याची माहिती घ्यावी. नेता मोठा आहे पण कान पितळेचे असून नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हीदेखील बारामती शहराच्या सोयीसुविधा सुविधांसाठी मागणी करत आहोत आणि प्रशासनाच्या हातात हात मिळवून काम करत आहोत हा संदेश एकत्र जायला हवा. एकीकडे अजित पवार हे कोरोनाच्या लढ्यामध्ये राजकारण आणू नका असे म्हणतात आणि त्यांच्या स्थानिक नेता मात्र सातत्याने कोरोनाच्या लढ्यामध्ये राजकारण आणतो हे मात्र चित्र बरोबर नाही असे पाटसकर म्हणाले