दिलीप निंबाळकर यांची ग्राहक पंचायतीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड
जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे
दिलीप निंबाळकर यांची ग्राहक पंचायतीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड
बारामती वार्तापत्र
ग्राहकांच्या हक्कासाठी लढणारी, बिगर राजकीय संघटना म्हणून ज्या संघटनेकडे पाहिले जाते ती संघटना म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक पंचायतीचे सबंध देशभर कार्य चालू असते ग्राहकांचे संघटन करणे ,ग्राहकांचे शोषन थांबवणे ,फसवणूकी विरुद्ध आवाज उठवणे, ग्राहकांचे प्रबोधन करून त्याच्यात जाणीव-जागृती निर्माण करण्याचे काम गेली 45 वर्ष संघटनेच्या माध्यमातून होत आहे
या देशव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सणसर ता. इंदापूर येथील दिलीप मारुती निंबाळकर यांची निवड झाली आहे त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष श्री धनंजय गायकवाड यांनी दिले दि.5 डिसेंबर रोजी प्रांत कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीमध्ये दिलीप निंबाळकर यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली
दिलीप निंबाळकर गेली वीस वर्षापासून ग्राहक पंचायतीच्या कार्यात सक्रिय आहेत त्यांनी यापूर्वी इंदापुर तालुका अध्यक्ष, सचिव पुणे जिल्हा या पदांवर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सामान्य ग्राहक केंद्रबिंदू मानून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निंबाळकर यांनी आजवर आरोग्य, रेशन धान्य, विज , महसुल, या विषयांत मोलाचे कार्य केले आहे त्यांच्याकडे असलेले संघटनकौशल्य यामुळे संघटनेच्या वतीने त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे
माजी जिल्हा अध्यक्ष, संघटक व सर्व कार्यकारणी यांच्या सहकार्याने ग्राहक पंचायतीच्या कार्य वाढीसाठी प्रयत्न करणे व ग्राहकांना त्यांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून फसवणुकीपासुन त्यांचे संरक्षण करण्याचे काम आगामी काळात केले जाईल
श्री दिलीप निंबाळकर
नुतन जिल्हा अध्यक्ष, अखील भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा