दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने गिफ्ट, पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी; तरीही दर 100 रुपयांपुढेच राहणार
गेल्या महिन्यात दररोज 30 आणि 35 पैशांनी पेट्रोल वाढून 7.45 रुपयांनी महागले, तर डिझेल 7.90 रुपयांनी महाग झाले. मात्र, आजच्या कपातीमुळे डिझेलमधील सर्व ऑक्टोबरमधील दर पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने गिफ्ट, पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी; तरीही दर 100 रुपयांपुढेच राहणार
गेल्या महिन्यात दररोज 30 आणि 35 पैशांनी पेट्रोल वाढून 7.45 रुपयांनी महागले, तर डिझेल 7.90 रुपयांनी महाग झाले. मात्र, आजच्या कपातीमुळे डिझेलमधील सर्व ऑक्टोबरमधील दर पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र, सध्याचे इंधनाचे वाढलेले भरमसाठ पाहता उत्पादन शुल्कातील कपात फारशी नसल्याचे म्हटले जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांहून अधिक आहे. गेली काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज प्रति लिटर 35 पैशांनी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर जनतेसह विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, उत्पादन शुल्कात कपात केल्याने मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होणार आहे.
11 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 85 डॉलर आहेत. हे दर गेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक आहेत. भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या गरजेसाठी आयातीच्या तेल इंधनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातील सार्वजनिक तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढविण्यात येतात. दुसरीकडे केंद्र सरकारकडून इंधनावरील कराचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो.
🛑 तुमच्या राज्यात किती रुपयांना पेट्रोल अन् डिझेल मिळणार?
💠 दिल्लीत पेट्रोल 105 रुपये आणि डिझेल सुमारे 89 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होणार आहे.
💠 मुंबईत पेट्रोल 110 रुपयांच्या आसपास आणि डिझेल 97 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे.
💠 चेन्नईमध्ये पेट्रोल 101 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 93 रुपये प्रतिलिटरच्या आसपास असेल.
💠 कोलकात्यात पेट्रोल 105 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 92 रुपये प्रतिलिटर असेल.
💠 लखनऊमध्ये पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 89 रुपये प्रतिलिटर उपलब्ध असेल.
💠 जयपूरमध्ये पेट्रोल 114 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल सुमारे 99 रुपये प्रतिलिटरने उपलब्ध होईल.
💠 शिमल्यात पेट्रोल सुमारे 103 रुपये प्रति लिटर आणि डिझेल सुमारे 88 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
💠 डेहराडूनमध्ये पेट्रोल सुमारे 101 रुपये प्रति लिटर आणि डिझेल सुमारे 90 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होईल.