दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची बारामतीमध्ये गर्दी
गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची बारामतीमध्ये गर्दी
गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असणारे पवार कुटुंबीय दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले आहेत. काल लक्ष्मीपूजनानंतर पवार कुटुंबीयांची मेजवानी पार पडली. यावेळी गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येत पवार कुटुंबाने खास फोटोसेशन केले. यावेळी प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत. वर्षातून एकदा संपूर्ण पवार कुटुंबियांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असल्यानं कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच सभागृहात गर्दी करत दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत. यंदा भेटण्याच्या स्थळात थोडासा बदल करण्यात आला असून पवार कुटुंबिय दिवाळीच्या पाडव्याला गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाऐवजी लगतच असलेल्या डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहात लोकांना भेटत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनामुळे कार्यक्रम रद्द
गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाकडून करण्यात आलं होतं.