दिशा कृषी उन्नतीची-2029 अभियानाअंतर्गत केळी पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कदम यांनी ए आय आधारित ऊसशेती विषयी माहिती दिली.

दिशा कृषी उन्नतीची-2029 अभियानाअंतर्गत केळी पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कदम यांनी ए आय आधारित ऊसशेती विषयी माहिती दिली.
बारामती वार्तापत्र
‘दिशा कृषी उन्नतीची-2029 या पंचवार्षिक अभियानात निश्चित केल्यानुसार अधिकाधिक शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड करावी, याकरीता कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके म्हणाले.
सदोबाचीवाडी येथे आयोजित केळी समूह शेती माहिती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी उप कृषी अधिकारी प्रवीण माने, सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे, कृषी विज्ञान केंद्राचे ऋषिकेश कदम, मंडळ कृषी अधिकारी अप्पासाहेब झंजे, शेतकरी उपस्थित होते.
श्री. हाके म्हणाले, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन केळी लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केळी पिकाकरिता ठिबक सिंचन अनुदान, केळीपासून चिप्स, केळी पुरी, जाम, भुकटी आदी पदार्थनिर्मिती, निर्यातप्रक्रिया, शीतसाखळी प्रक्रिया युनिट उभारणी आदीबाबत माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कदम यांनी ए आय आधारित ऊसशेती विषयी माहिती दिली.
श्री. माने यांनी पीक विमा योजना, शेतकरी ओळखपत्र, कृषी संवाद व्हाट्सअप चॅनेल आदीबाबत माहिती दिली.