स्थानिक

दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी सौ. नुपूर आदेशकुमार शहा यांची निवड

नारी शक्तीचा सन्मान

दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी सौ. नुपूर आदेशकुमार शहा यांची निवड

नारी शक्तीचा सन्मान

बारामती वार्तापत्र 

आज दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्र उत्सवाच्या मंगल प्रसंगी, बँकेने मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळ सभेत सर्वानुमते सौ. नुपूर आदेशकुमार शहा यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन व सशक्तीकरणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा निर्णय बँकेच्या सामाजिक दायित्वाशी सुसंगत असून, महिलांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बँकेचे धोरण अधोरेखित करतो.

नवरात्र उत्सव हा स्वीशक्तीचा उत्सव मानला जातो आणि या दिवशी महिला उपाध्यक्ष पदावर विराजमान होणे ही बँकेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. या निवडीमुळे बँकेच्या व्यवस्थापनात महिला सक्षमीकरणास चालना मिळेल, तसेच समाजातील इतर संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी नव्या महिला उपाध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

बँकेचे उपाध्यक्ष श्री. विजयराव प्रभाकरराव गालिंदे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालेले होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद दुरगुडे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था बारामती तालुका हे उपस्थित होते. त्यांनी या पदासाठी एकमेव सौ. नुपूर आदेशकुमार शहा यांचा अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध घोषित केले.

दि बारामती सहकारी बँकेच्या आजअखेर ठेवी रू. २२२१ कोटी, कर्जवाटप रू. १३२१ कोटी अशी बँकेने प्रगती केलेली आहे.

बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे. आज बँकेला ६४ वर्ष पूर्ण होत असून रू. २०,५००/- भागभांडवलावर सुरू झालेल्या या बँकेचे भागभांडवल रू. ५५.३६ कोटींवर पोहोचलेले आहे. याबाबतची माहिती बँकेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी यांनी दिली.

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सातव, तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी, संचालक श्री. रोहित घनवट, श्री. किशोर मेहता, श्री. विजयराव गालिदे, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. उध्दव गावडे, श्री. नामदेवराव तुपे, श्री. जयंत किकले, श्री. रणजित धुमाळ, श्री. मंदार सिकची, डॉ. सौरभ मुखा, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तज्ञ संचालक तथा व्यवस्थापन मंडळ सदस्य अॅड. रमेश गानबोटे, तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री. शांताराम भालेराव व डॉ. अमोल गोजे तसेच प्रभारी कार्यकारी संचालक श्री. विनोद रावळ, सरव्यवस्थापक श्री. सोमेश्वर पवार, उपसरव्यवस्थापक श्री. प्रशांत शिर्के व मुख्यालयातील इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Back to top button