दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. श्री. कुलकर्णी यांची तर व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी श्री. गावडे यांची निवड
बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू, २२१२ कोटी

दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. श्री. कुलकर्णी यांची तर व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी श्री. गावडे यांची निवड
बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू, २२१२ कोटी
बारामती वार्तापत्र
दि बारामती सहकारी बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्षपदी अॅड. श्री. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांची निवड करणेत आली.
तसेच अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड झालेने व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर श्री. उद्धव सोपानराव गावडे यांची व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
बारामती सहकारी बँक समाजाच्या विश्वासाचा वारसा जपणारी बँक आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या बारचालीत दिवंगत अजितदादा पवार यांचे विचार, कार्य व योगदान सदैव मार्गदर्शक ठरले आहे. यापुढेही माननीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बैंक प्रगती करीत राहील.
बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू, २२१२ कोटी, कर्जवाटप रू. १३७४ कोटी व गुंतवणूक रू. ९८० कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. २.५८% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १६.७२% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे.
या बैठकीदरम्यान संचालक मंडळाने पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. सचिन सातव, उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी तसेच संचालक श्री. रोहित घनवट, श्री. किशोर मेहता, श्री. विजयराव गालिंदे, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. उद्धव गावडे, श्री, नामदेवराव तुपे, श्री. जयंत किकले, श्री. रणजित धुमाळ, श्री. मंदार सिकची, डॉ. श्री, सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक अॅड. श्री. रमेश गानबोटे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री. ओंकार देवळे तसेच कार्यकारी संचालक श्री. विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.






