दि बारामती सहकारी बँक लि. च्या सभासदांना जाहीर निवेदन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पूर्वीची रिझर्व्ह फंडाची व इमारत निधीची गुंतवणूक ही असल्यामुळे या बँकेतील गुंतवणुकीचे प्रमाण हे शेकडा पाच टक्क्यांच्या वर झालेले होते.
दि बारामती सहकारी बँक लि. च्या सभासदांना जाहीर निवेदन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पूर्वीची रिझर्व्ह फंडाची व इमारत निधीची गुंतवणूक ही असल्यामुळे या बँकेतील गुंतवणुकीचे प्रमाण हे शेकडा पाच टक्क्यांच्या वर झालेले होते.
बारामती वार्तापत्र
बारामती सहकारी बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक यांना कळविण्यात येते की, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी संकलित झाल्यामुळे व त्या आर्थिक वर्षात तुलनेने कर्जवाटप कमी झाल्यामुळे शिल्लक राहिलेला निधीची गुंतवणूक ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. पुणे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मुंबई यामध्ये गुंतविलेल्या होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. पुणे या बँकेत पूर्वीची रिझर्व्ह फंडाची व इमारत निधीची गुंतवणूकही असल्यामुळे या बँकेतील आपल्या बँकेच्या गुंतवणुकीचे प्रमाण हे शेकडा ५ टक्केचे वर झालेले होते.रिझर्व्ह बँकेने दि. ३१ मार्च २०१९ अखेर केलेल्या बँक तपासणीत ही ५ टक्केपेक्षा जास्त वाढीव गुंतवणूक काढून अन्य बँकांमध्ये वर्ग करण्याचे निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे आपल्या बँकने जिल्हा बँकमधील जादा ठेवी अन्य बँकांत वर्ग केलेल्या आहेत. तथापि नियमाचे तांत्रिक उल्लंघन झाले असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या रिझर्व्ह बँकेने बारामती सहकारी बँकेस रु. १.०० लाखाचा दंड केलेला आहे. त्यामुळे खातेदारांच्या व ठेवीदारांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका संभ्रम राहू नये म्हणून सदरचे जाहीर निवेदन प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या सर्वांचे बँकेवरील प्रेम व विश्वास यांमुळे बँकेच्या ठेवींमध्ये सतत वाढ होत आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारातही उत्तमरित्या वाढ होत आहे व बँक गेली अनेक वर्ष सतत कोट्यवधींचा नफाही कमवीत आहे. बँकची सांपत्तिक स्थिती उत्तम असून, खातेदारांनी व ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये बाळगू नये, ही नम्र विनंती. बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड व प्रभारी कार्यकारी संचालक रवींद्र बनकर .