दि, माळेगाव सहकारी साखर कारखाना मध्ये वायू गळती होऊन ८ कामगार गुदमरले ३ प्रक्रूती चिंताजनक .
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील टाकीची सफाई करताना विषारी गॅस गळतीमुळे आठ कामगार बेशुद्ध; तीन अत्यवस्थ...
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आज दुर्घटना घडली असून आठ कामगार यामध्ये जखमी झाले आहेत. याकामगारांवर बारामतीत वाबळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. माळेगाव साखर कारखान्यात पॅनमध्ये साखर वितळण्याची प्रक्रिया सुरूअसताना गॅस होऊन या गॅसचा त्रास तेथे काम करत असलेल्या कामगारांना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या कामगारांना मेंदूस ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचा त्रास सुरू झाल्याने तातडीने बारामतीत वाबळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे योगेश जगताप यांनी सांगितले आहे.