स्थानिक

दुकान फोडी करणाऱ्या महिलेस अटक.

राज्यस्थान सारीज चे दुकान मध्ये चोरी ची घटना.

दुकान फोडी करणाऱ्या महिलेस अटक.

राज्यस्थान सारीज चे दुकान मध्ये चोरी ची घटना.

बारामती:वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत बारामती शहरात महाविरपथ येथील मे.राजस्थान सारीज दुकानाचे बेसमेंट गाळयातुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गाळयाचे शटर उचकटुन त्यातील माल चोरी करून चोरून नेले
बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक १२/०४/२०२० रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल होता.

त्याप्रमाणे गुन्हयातील गेले मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.बारामती शहरातील आमराई वसाहत येथील महिला आरोपी नामे १) आरती शंकर पाथरकर वय
२५ वर्षे २) सारिका लाला भाले वय ३० वर्षे ३) दुर्गा आकाश साळुखे वय २५ वर्षे ४) शकिला इस्माईल कुरेशी वय २२ वर्षे यांना ताब्यात घेवुन तपास केला असता सदर महिला आरोपी यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली.

त्यांचेकडून तपासादरम्यान १९,१६०/-रूपये किंमतीचा गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल हस्तगत करून गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास अदयाप सुरू आहे.

सदरची कामगिरी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साो, पोलीस निरीक्षक श्री.औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पो.ना ओंकार सिताप,पो.कॉ.पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे ,सुहास लाटणे, अंकुश दळवी,दशरथ इंगवले,अजित राऊत, योगेश कुलकर्णी,अकबर शेख ,उमेश गायकवाड यांनी केली.

अशी माहिती बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली .

Related Articles

Back to top button