दुधगंगाचे चेरअमन मंगेश पाटील यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी दुःखद निधन
इंदापूर शहरातील राजकारणात त्यांचे वेगळेच वलय होते.

दुधगंगाचे चेरअमन मंगेश पाटील यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी दुःखद निधन
इंदापूर शहरातील राजकारणात त्यांचे वेगळेच वलय होते.
इंदापूर तालुक्यातील राजकिय आखाड्यातील दिग्गज व्यक्तीमत्व स्वकष्टातून राजकारणात यशस्वी झालेले नेतृत्व म्हणून ओळख असणारे व दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे विद्यमान चेअरमन मंगेश वामनराव पाटील यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी दु:खद निधन झाले.आज गुरूवारी दि.१५ रोजी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
मंगेश पाटील यांना दि.१३ एप्रिल गुढीपाडव्यादिवशी दुपारी रुदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आल्याचे वृत्त होते.उपचारा दरम्यान त्यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून निकटवर्तीयांना धक्का बसला आहे.
संचारबंदीत देखील सामाजिक बांधिलकी म्हणून इंदापूरातील सर्व मशिनरी व्यापारी,व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पाटील यांना त्यांना श्रध्दांजली वाहिली.
मंगेश पाटील हे “बाबा” या टोपण नावाने तालुक्याच्या राजकारणात परिचित होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय असणारे मंगेश पाटील यांनी हर्षवर्धन पाटील वाहतूक संस्थेचे चेअरमन पद अनेक वर्ष भूषविले होते. सध्या ते दूधगंगा दूध उत्पादक संघाचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत होते इंदापूर शहरातील राजकारणात त्यांचे वेगळेच वलय होते.