स्थानिक

दूध संघाच्या प्रमुखांनी घेतली एक कोटी पेक्षा जास्त ऍडव्हान्स रक्कम, त्यावर आता व्याज आकारले जाणार का? बारामतीमध्ये चर्चांना उधाण

हा प्रश्न आता सर्वसामान्य सभासदांमध्ये आणि स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

दूध संघाच्या प्रमुखांनी घेतली एक कोटी पेक्षा जास्त ऍडव्हान्स रक्कम, त्यावर आता व्याज आकारले जाणार का? बारामतीमध्ये चर्चांना उधाण

हा प्रश्न आता सर्वसामान्य सभासदांमध्ये आणि स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामतीत दूध संघाच्या कारभारावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, संघाच्या प्रमुखांवर नियमांच्या बाहेर जात जास्त अँडव्हान्स घेतल्याचे आरोप होत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संघाच्या नियमांनुसार मर्यादित स्वरूपात साधारण दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत ऍडव्हान्स घेण्याची परवानगी असताना संबंधित प्रमुखांनी तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ऍडव्हान्सच्या स्वरूपात घेतल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे ही रक्कम बिनव्याजी वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेचा वैयक्तिक वापर केल्यास तो नियमबाह्य ठरू शकतो. त्यामुळे “या रकमेवर व्याज आकारले जाणार का?” हा प्रश्न आता सर्वसामान्य सभासदांमध्ये आणि स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंगही चढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी विद्यमान प्रमुखांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन प्रमुखांची नियुक्ती करण्याचे आश्वासन एका संचालकाला दिले होते.मात्र,स्थानिक राजकीय नेत्याच्या पाठबळामुळे संबंधित प्रमुखांनी पुन्हा पद मिळवल्याची चर्चा आहे.

पदावर पुनर्नियुक्ती झाल्यानंतरही गैरवापर सुरू असल्याचे आरोप होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.सभासद आणि स्थानिक नागरिकांकडून पारदर्शक कारभार,आर्थिक शिस्त आणि जबाबदारी निश्चित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात संबंधित प्रमुखांनी घेतलेली ऍडव्हान्स रक्कम नियमांनुसार होती का, त्यावर व्याज आकारले जाणार का,तसेच संचालक मंडळाने याबाबत कोणती भूमिका घेतली आहे,हे पुढील काळात स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button