रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँक, बारामती शाखेचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती परिसरातून अनेक सभासद बंधू-भगिनी उपस्थित

रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँक, बारामती शाखेचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती परिसरातून अनेक सभासद बंधू-भगिनी उपस्थित
बारामती वार्तापत्र
बारामती येथील सर्व रयत सेवकांची आर्थिक कणा म्हणून ओळख असणाऱ्या रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँक, बारामती या शाखेचा 31 वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गेली 30 वर्ष रयत शिक्षण संस्थेतील कार्यरत असणाऱ्या सेवकांना आर्थिक पुरवठा करण्याचे महत्वाचे काम ही बँक करत आहे.
या शाखेचे चेअरमन श्री अशोक कोलते, स्वीकृत संचालक श्री वैभव यादव ,श्री गणेश कोंढाळकर व सर्व बँक कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
रयत या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती परिसरातून अनेक सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते.यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री सुभाष लकडे ,मा.चेअरमन श्री देविदास गुरव ,मा.व्हा.चेअरमन व शाहू विद्यालयाचे प्राचार्य श्री गणपतराव तावरे टेक्निकल विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे,प्राचार्य श्री अनिल धुमाळ,प्राचार्य श्री अशोक थोरात, तसेच रयत मित्र मंडळाचे सहसचिवश्री बालाजी बोंबडे ,पुणे विभागीय सचिव श्री शिवाजी मराडे ,पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेश गायकवाड बारामती शाखेच्या शाखा अधिकारी सौ. उल्का पवार यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आपल्या मनोगतात शाखा समिती चेअरमन श्री अशोक कोलते यांनी सभासदांना अधिक अधिक चांगल्या सेवा देण्याचे आश्वासन दिले.
तसेच या कार्यक्रमासाठी श्री महादेव शेलार,श्री ज्ञानदेव म्हस्के,श्री किरणकुमार कोकणी,श्री विकास जाधव,श्री मोहन बुट्टे,श्री रमेश गोळे, श्री भारत भोसले,श्री परमेश्वर सूर्यवंशी,श्री बाळासाहेब खलाटे,श्री रीमाजी मारकड,सौ सारिका वाघ, सौ सीमा रासकर,उपस्थित होते.तसेच
शाखा सेवक – श्री शामराव जाधव, श्री विजय चाळेकर,श्री विनायक कोल्हटकर,श्री अजिंक्य मोरे उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे आभार टी.डी.एफ चे इंदापूर तालुका अध्यक्ष व शाखेचे संचालक श्री वैभव यादव यांनी मांडले.