देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमागे ‘हे’ आहे कारण
काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये?
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमागे ‘हे’ आहे कारण
काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली.
काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत संजय राऊत यांची भेट झाली आहे. जय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली.
बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.