देशपांडे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
देशपांडे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग. भि. देशपांडे विद्यालयात प्रमुख अतिथी यशस्वी उद्योजक चंद्रगुप्त शहा वाघोलीकर यांचे उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
१९७० च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले शहा म्हणाले की शाळेचा लौकिक आजही टिकून आहे. चित्रकला, प्रयोग आदी उपक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाला समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित यांनी अध्यक्षीय भाषणातून आजच्या या नवीन युगात मुलांवर फेसबुक, इंस्टाग्राम, टीव्ही व मीडिया यांचा अतिरेक होऊन चुकीचे संस्कार होत असल्याची खंत व्यक्त करून भाषा,भूषा,भोजन,भजन,भ्रमण या पंच-परिवर्तनांचे संस्कार मुलांवर करण्याचे आवाहन उपस्थित सर्वांना केले.
प्रशालेचे महामात्र गोविंद कुलकर्णी यांनी खाऊच्या पैशातून प्रयोग सादर करणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून आपले प्रयोग राष्ट्रीय पातळीवर जावेत अशी अपेक्षा व्यक्त करून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी तालुका पातळी पासून राष्ट्रीय पातळी पर्यंत प्रशालेतील विद्यार्थ्याच्या यशाचा चढता आलेख अहवाल वाचनातून प्रकट केला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी,स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष दत्तात्रय शेरखाने,पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलीप पाटील, जयश्री शिंदे, क्रीडाध्यक्ष प्रशांत सोनवणे, इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अनिता तावरे हेही उपस्थित होते.
दरम्यान खानाखजाना कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंगाडे, पंचायत समिती समन्वयक वैशाली शेळके व मनीषा जराड उपस्थित होत्या. तसेच विभागवार झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक आनंद मोरे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिताडे, अँड गुलाबराव गावडे, अँड सुधीर पाटसकर, अँड रवींद्र रणसिंग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात मुलींनी ‘कर्तबगार महिला’ तर मुलांनी ‘देशभक्ती’ या विषयांवर उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले. विभागवार कार्याध्यक्ष म्हणून शंकर घोडे, गणपत जाधव, राहुल पोथरकर, सविता सनगर, अपर्णा शिंदे, स्वप्निल गोंजारी यांनी काम पाहिले. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु.देवयानी कोकणी,कु.प्रांजल सावंत, कु.सानिका सोनवणे तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि.राजवीर गावडे, चि.ओंकार सरोज यांना सन्मान मिळाला.
यानिमित्ताने स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीव देशपांडे, जवाहर वाघोलीकर, फणेंद्र गुजर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता सनगर यांनी तर परिचय व स्वागत रवींद्र गडकर यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी देशपांडे यांनी केले आणि दत्तात्रय शेरखाने आभार मानले.