स्थानिक

देश-विदेशातील लोकांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक….. खासदार सुप्रिया सुळे

आजचे पदवीधर व शिक्षक संघाचे मतदान झाल्यानंतर सरकारकडून काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल

देश-विदेशातील लोकांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक….. खासदार सुप्रिया सुळे

आजचे पदवीधर व शिक्षक संघाचे मतदान झाल्यानंतर सरकारकडून काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल

बारामती वार्तापत्र

मागील वर्षभरात महाविकास आघाडीने खूप संघर्ष केला आहे. कोरोना महामारी व त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीच्या काळात सरकारने उत्तम काम केले आहे. असे मी म्हणत नाही तर केंद्र सरकारचा अहवाल सांगत आहे. तसेच देश-विदेशातून येणाऱ्या लोकांकडूनही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याची पावती देतात. असे प्रतिपादन बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

 

पदवीधर निवडणुकीच्या मतदानाचा आज सुळे यांनी बारामतीत हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांना बोलण्यासारखे काहीच न राहिल्याने ते सातत्याने सरकार पडणार असल्याचे बोलतात. तसेच त्यांची संघटना टिकवण्यासाठी व त्यांच्या कार्यकर्त्यातील उत्साह कमी झाला आहे. त्यामुळे ते सरकार पडणार पडणार असल्याचे वारंवार बोलतात. अशी टीका यावेळी सुळेंनी केली.

वीज बिलासंदर्भात सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आचारसंहिता असल्यामुळे सरकारला मन मोकळेपणाने बोलता आले नाही. आजचे पदवीधर व शिक्षक संघाचे मतदान झाल्यानंतर सरकारकडून काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram