दैवतारी त्याला कोण मारी….डॉ मुथा च्या तत्परतेमुळे बालकाला मिळाले जीवदान
बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती

दैवतारी त्याला कोण मारी….डॉ मुथा च्या तत्परतेमुळे बालकाला मिळाले जीवदान
बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती
बारामती वार्तापत्र
असे नेहमी म्हटले जाते, त्याचा प्रत्यय बारामतीमध्ये आला. एका साहे महां महिनाच्या बाळाच्या घशात आणि श्वसनलिकेत (LARYNGOPHARY- म्हणजेच स्वरयंत्रच्या असलेल्या कंठातील पोकळीच्या भागामध्ये 3.5 cm लांबीचे आणि एका बाजूने धारदार असलेले सौन्याचे कानातले अडकलेले होते.
बाळाल त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच पालक खूप घाबरले आणि त्यांनी ताबडतोब बारामतीमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटल, भिगवण रोड, बारामती येथे घेऊन आले.
हॉस्पिटल मध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती आणि त्याच्या तोंडातून रक्तस्राव सुरु झाला होता.
बाळाला ताबडतोब हॉस्पिटलमधील बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र मुथा सर, डॉ. सौरभ मुथा सर आणि डॉ. प्रियांका मुथा मॅडम यांच्या साहाय्याने बारामतीमधील नाक, कान, घसातज्ञ डॉ. वैभव मदने सर आणि भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार सर ज्यांच्या मदतीने अतिशय कौशल्यपूर्वक आणि जोखमीची शस्त्रक्रिया व स्कोपी पार पाडण्यात आली.
संबंधित बालकाच्या घशातून दुर्बिणीद्वारे हे सोन्याचे कानातले यशस्वीरीत्या काढण्यात आले.
अवघ्या काही मिनिटात बारामतीच्या या सर्व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने या साडे सहा महिन्याच्या बालकाला अक्षरशा: मरणाच्या दारातून परत आणले आणि सर्व डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
म्हणुनच म्हणताता की देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे सर्व डॉक्टरांनी मिळून त्याच्यावरती उपचार करून त्याला जीवनदान दिले.
पालकांनी श्रीपाल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचे मनपुर्वक आभार मानले.