स्थानिक

दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची पोलीस ठाण्यात कुंडली तयार केली जाणार.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार

दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची पोलीस ठाण्यात कुंडली तयार केली जाणार.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार

बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपींची आता कुंडली तयार केली जाणार आहे. यापुढे पूर्वी आरोपीने गुन्हे केलेले आहेत त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींनी परत जर गुन्हा केला तर त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायदा किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.

तरी पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या आरोपी बरोबर नवीन आरोपींनी जरी गुन्हा केला तरी त्याला सुद्धा याच कायद्याने कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वसामान्य माणसांनी गुन्हेगारी व्यक्तीच्या कारवाई मध्ये सामील होऊ नये व आपले भविष्य खराब करून घेऊ नये असेही आव्हान देखील सर्व तरुणांना करण्यात आले आहे.

सुनील महाडिक यांनी नुकताच बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. हा कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक चांगली असावी या साठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button