पुणे

दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले ;अजित पवारांचं सूचक विधान

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती.

दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले ;अजित पवारांचं सूचक विधान

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती.

पुणे:बारामती वार्तापत्र

दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे, असं सांगतानाच तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. तीनचा प्रभाग हे फायनल आहे. मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू, असं अजितदादा म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रभाग रचनेत बदल का?

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!