दौंड

दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज डायलिसीस युनिटचे; आमदार राहुल कुल यांच्या हस्ते लोकार्पण

डायलिसीस साठीच्या अपुर्‍या सुविधा व त्याचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर

दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज डायलिसीस युनिटचे; आमदार राहुल कुल यांच्या हस्ते लोकार्पण

डायलिसीस साठीच्या अपुर्या सुविधा व त्याचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर
दौंड ;प्रतिनिधी

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या सुसज्ज डायलिसिस युनिटचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या युनिटमध्ये रुग्णांच्या देखरेखीसाठी आवश्यक सर्व उपकरणांचा समावेश आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २ डायलिसिस मशीन युवा उदयोजक जितेंद्र मगर यांनी स्व. निवृत्ती कोंडिबा मगर यांच्या स्मरणार्थ आवश्यक फर्निचर आणि वातानुकूलन यंत्रणा दिली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधींमुळे किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यानंतर रुग्णाला डायलिसिसची आवश्यकता असते, परंतु डायलिसिससाठीच्या अपुऱ्या सुविधा व त्याचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर असतो तेव्हा दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना डायलिसिसची मोफत सुविधा उपलब्ध होणार असून उपचारासाठी त्यांनापुण्याला जायची गरज भासणार नाही.

याप्रसंगी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व कर्मचाऱ्यांशी आमदार राहुल कुल यांनी संवाद साधला. आ. राहुल कुल यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन उपलब्ध झालेल्या डायलिसिस मशीन उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे कार्यान्वित करण्यात येत आहेत. सुसज्ज अशा या डायलिसिस युनिटची किंमत २० लाख रुपये आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, डॉ.दीपक जाधव, जितेंद्र मगर, राजू गजधने यांच्यासह वैद्यकीय रुग्णालयातील सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram