दौंडतालुक्यातील केडगाव येथे वाखारी रोडवर इनोव्हातून ७९ हजारची विदेशी दारू जप्त
दौंड तालुक्यातील केडगाव येथे वाखारी रोडवर एका इनोव्हा क्रिस्टा एमएच ४२ एएस ०८०८ गाडीतून बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत ७९ हजार २०० रुपये इतकी आहे.

दौंड – बारामती वार्तापत्र
पुण्याच्या दौंडतालुक्यातील केडगाव येथे वाखारी रोडवर एका इनोव्हा क्रिस्टा एमएच ४२ एएस ०८०८ गाडीतून बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत ७९ हजार २०० रुपये इतकी आहे. यवत पोलिसांनी या गाडीसह दारू ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव-वाखारी रोडवर पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, हवालदार संपत खबाले आणि चालक व्ही. आवाळे हे पेट्रोलिंग होते. त्यावेळी त्याना माहिती मिळाली, की एक चॉकलेटी रंगाच्या इनोव्हामध्ये विदेशी दारूचा साठा असून, ही कार वाखारीकडून केडगावकडे येत आहे. यामुळे पोलीस पथकाने इनोव्हा गाडी थांबवून तपासणी केली असता त्यांना विदेशी मद्यसाठा आढळून आला.
चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
यावेळी इनोव्हा गाडीचा चालक गणेश फराटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. या गाडीतून सुमारे ७९ हजार २०० रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गणेश फराटे याच्यावर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गाडीसह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १५ लाख ७९ हजार २०० रुपये इतकी आहे.