दौंडमधील अंबिका कला केंद्रामधील गोळीबार प्रकरणी,आमदारकी धोक्यात येताच भावाने केले हात वर, ‘चार भाऊ असतात त्यातला एक चोर असतो तर एक देव’
पत्रकार परिषद घेत भावावर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.

दौंडमधील अंबिका कला केंद्रामधील गोळीबार प्रकरणी,आमदारकी धोक्यात येताच भावाने केले हात वर, ‘चार भाऊ असतात त्यातला एक चोर असतो तर एक देव’
पत्रकार परिषद घेत भावावर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
दौंड;प्रतिनिधि
दौंडमधील अंबिका कला केंद्रामधील गोळीबार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर- वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात शंकर मांडेकर यांची आमदारकी धोक्यात येणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे.
दरम्यान, शंकर मांडेकर यांनी पत्रकार परिषद घेत , “चार भाऊ असतात त्यातला एक चोर असतो तर एक देव असतो” असे म्हणत हात वर केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे चौफुला परिसरासह पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षासह त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, शंकर मांडेकर यांनी पत्रकार परिषद घेत भावावर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले शंकर मांडेकर?
मला या घटनेची काही कल्पना नव्हती. मला काल दूपारी पोलीसांचा फोन आला. त्यांनी मला सर्व घटनेची माहिती दिली. त्यावेळी मी कायद्यानुसार करा असे सांगितले आहे. मी कोणताही दबाव टाकला नाही. काय घडलं ते मलाही माहीत नव्हतं आणि पोलीसांनाही माहीत नव्हतं. मी भावाला सांगीतलं की पोलीसांच्या समोर हजर हो. चुकीचं काही घडलं असेल तर हस्तक्षेप करणार नाही मग माझा भाऊ असेल तरी चालेल. मात्र, माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नाही. ज्याची बंदूक आहे त्याला विचारतील. माझा भाऊ शेती बघतो. समाजकारण करतो. वारकरी संप्रदाय मधील आहे.
ही घटना घडल्यावर ते सकाळी घरी आले, मी रस्त्याची पाहणी करायला गेलो होतो, गणेश जगताप सुद्धा तिथे उपस्थित होते, भावाने मला काही सांगितलं नाही. तो त्यांच्याबरोबर गेला ही चुकच आहे, घडलेली घटना निंदनीय आहे, कारवाई झालीच पाहिजे. चार भाऊ असतात त्यातला एक चोर असतो एक देव असतो, चुकीचं प्रायश्चित शासन त्याला देईल.