दौंडमध्ये खळबळ;स्टेटसला लेकीचा फोटो अन् स्वतःला श्रद्धांजली, पोलीस निरीक्षकाचे धक्कादायक कृत्य
तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...

दौंडमध्ये खळबळ;स्टेटसला लेकीचा फोटो अन् स्वतःला श्रद्धांजली, पोलीस निरीक्षकाचे धक्कादायक कृत्य
तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा…
बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले आहेत.स्टेटसला लेकीचा फोटो ठेवत त्यांनी एक भावनिक मेसेजही लिहला आहे. ज्यामध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप करत जिवाचे बरे वाईट करत असल्याचं म्हटलं आहे.
पोलीस निरीक्षक बेपत्ता
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. यवत पोलिसांकडून नाईक निखिल रणदिवे यांचा शोध घेतला जात असून सध्या त्यांचा मोबाईल देखील बंद आहे. नाईक निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
नाईक निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्ष पासुन सतत त्रास देत आहेत. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. असा गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आहे. शुक्रवारी दुपारपासून रणदिवे यांचा मोबाईल बंद असून ते अद्याप पर्यंत मिळून आलेले नाहीत त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
नाईक रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती, मात्र यवत पोलिसांकडूननाईक निखिल रणदिवे यांना सोडण्यात आलं नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते. सध्या त्यांचं कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केलं होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
भावनिक पोस्ट
माझी प्रिय दिदी.. आज तुझा पहिला वाढदिवस, पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्टांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेवून जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्ष पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझेकडुन दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा…केलेल्या कामाची पोच पावती आहे..भावपूर्ण श्रद्धांजली, असं रणदिवे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






