माळेगाव बु

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी बाजी मारली ;21 पैकी 20 उमेदवार विजयी

विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी बाजी मारली ;21 पैकी 20 उमेदवार विजयी

विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश

बारामती वार्तापत्र

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेल्या निळकंठेश्वर पॅनलला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन्ही पॅनलला मोठा धक्का बसला असून शरद पवारांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमधील ते स्वतःच फक्त निवडून आले आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या गटाने बळीराजा सहकार पॅनल उभे केले होते. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार हे करत होते मात्र या पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे तर अजित पवारांनी उभ्या केलेल्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले असून चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार येथे निवडून आले आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवत होते. ते ‘ब वर्ग’ गटातून सर्वप्रथम विजयी झाले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चार पॅनल उभे होते. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक असे चार पॅनल रिंगणात होते. यात अजितदादा यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर काल दि. २४ व आज दि. २५ जून अशा दोन दिवस सलग मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीपासूनच अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र अन्य गटात आम्ही पुढे जाऊ असाच विश्वास विरोधक व्यक्त करत होते. एवढ्यावरच न थांबता या निवडणुकीत केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून येतील असा दावा केला जात होता.

दरम्यान, काल आणि आज झालेल्या मतमोजणीमध्ये निळकंठेश्वर पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सभासदांनी उत्स्फूर्त मतदान केल्याचं दिसून आलं. बारामती, सांगवी आणि महिला राखीव गटात चुरशीच्या लढती झाल्या. त्यामध्ये विरोधकांना केवळ सांगवी गटातून विजय मिळाला आहे. चंद्रराव तावरे यांचा बालेकिल्ला असलेल्या या गटातील बढत लक्षवेधी ठरली असली, तरी येथून निळकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

कारखान्याच्या उमेदवारनिहाय निकाल पुढील प्रमाणे –

ब वर्ग संस्था प्रतिनिधी –

अजित पवारनीलकंठेश्वर पॅनेल 91(विजयी)

भालचंद्र देवकातेसहकार बचाव पॅनेल – 10 (मताधिक्य – 81)

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघ –

विलास ऋषीकांत देवकातेनीलकंठेश्वर पॅनेल 8972 (विजयी)

सूर्याजी देवकातेसहकार बचाव पॅनेल 6598

(मताधिक्य – 2374)

इतर मागासप्रवर्ग –

नितीन वामनराव शेंडेनीलकंठेश्वर पॅनेल8494 (विजयी)

रामचंद्र नाळेसहकार बचाव पॅनेल7341

(मताधिक्य- 1153)

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग –

रतनकुमार भोसलेनीलकंठेश्वर पॅनेल8670 (विजयी)

बापूराव गायकवाडसहकार बचाव पॅनेल 7183

(मताधिक्य- 1487)

महिला राखीव प्रवर्ग –

संगीता कोकरेनीलकंठेश्वर पॅनेल8440 (विजयी)

ज्योती मुलमुलेनीलकंठेश्वर पॅनेल7576 (विजयी)

राजश्री कोकरेसहकार बचाव पॅनेल7485

सुमन गावडेसहकार बचाव पॅनेल 6099

(मताधिक्य- 955)

माळेगाव गट –

शिवराज जाधवरावनीलकंठेश्वर पॅनेल8612 (विजयी)

राजेंद्र बुरुंगलेनीलकंठेश्वर पॅनेल8116 ((विजयी)

बाळासाहेब तावरेनीलकंठेश्वर पॅनेल 7946 (विजयी)

रंजनकुमार तावरेसहकार बचाव पॅनेल7353

संग्राम काटेसहकार बचाव पॅनेल 6701

रमेश गोफणेसहकार बचाव पॅनेल6302

(मताधिक्य- 1259)

पणदरे गट –

योगेश जगतापनीलकंठेश्वर पॅनेल8635 (विजयी)

स्वप्नील जगतापनीलकंठेश्वर पॅनेल7933 (विजयी)

तानाजी कोकरेनीलकंठेश्वर पॅनेल8495 ((विजयी)

सत्यजित जगतापसहकार बचाव पॅनेल6232

रणजित जगतापसहकार बचाव पॅनेल6134

रोहन कोकरेसहकार बचाव पॅनेल7083

(मताधिक्य- 2403)

सांगवी गट –

गणपत खलाटेनीलकंठेश्वर पॅनेल 8543 (विजयी)

विजय तावरेनीलकंठेश्वर पॅनेल7882 (विजयी)

विरेंद्र तावरेनीलकंठेश्वर पॅनेल7289

चंद्रराव तावरेसहकार बचाव पॅनेल8163 (विजयी)

रणजित खलाटेसहकार बचाव पॅनेल7224

संजय खलाटेसहकार बचाव पॅनेल6154

(मताधिक्य-1319 )

बारामती गट –

नितीन सातवनीलकंठेश्वर पॅनेल7858(विजयी)

देवीदास गावडेनीलकंठेश्वर पॅनेल8028(विजयी)

गुलाबराव गावडेसहकार बचाव पॅनेल 7080

वीरसिंह गवारेसहकार बचाव पॅनेल7021

(मताधिक्य-948 )

नीरा वागज गट –

अविनाश देवकातेनीलकंठेश्वर पॅनेल – 8640 (विजयी)

जयपाल देवकातेनीलकंठेश्वर पॅनेल8051(विजयी)

राजेश देवकाते सहकार बचाव पॅनेल6499

केशव देवकातेसहकार बचाव पॅनेल6436

(मताधिक्य- 2141)

खांडज शिरवली गट –

प्रताप आटोळेनीलकंठेश्वर पॅनेल 8328(विजयी)

सतीश फाळके नीलकंठेश्वर पॅनेल8404(विजयी)

विलास सस्तेसहकार बचाव पॅनेल 6436

मेघशाम पोंदकुलेसहकार बचाव पॅनेल 6422

(मताधिक्य- 1892)

शरद पवार गटाचे पॅनेल निष्प्रभ

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री. निलकंठेश्वर पॅनेल व चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल यांच्यातच खरी लढत होत असल्याचे निकालावरून दिसून आले. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. परंतु हा पॅनेल निवडणुकीत कसलाही करिश्मा दाखवू शकलेला नाही. याशिवाय शेतकरी कष्टकरी समितीलाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. मुख्य दोन्ही पॅनेलची धाकधूक मात्र या दोन पॅनेलने वाढवल्याचे दिसून आले.

मतमोजणीवेळी सुसंस्कृत राजकारणाची झलक

माळेगावसाठी मतमोजणी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री. निलकंठेश्वर पॅनेलचे प्रचार प्रमुख व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप व सहकार बचाव पॅनेलचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांची मतदान केंद्राबाहेर भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत सुसंस्कृत राजकारणाची झलक दाखवून दिली.

नेमकं काय म्हणाले रंजन तावरे?

सभासदांनी दिलेल्या कौलाचा आम्ही स्वागत करोत. परंतू दारुण आमचा पराभव झाला नाही. या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या माळेगाव कारखान्याच्या छोट्या निवडणुकीसाठी माळेगावमध्ये बारामतीमध्ये 8 दिवसं थांबावं लागलं. कॅबिनेट सोडून त्यांना इथं यावं लागलं. शेजारच्या मंत्र्यांना त्यांना बोलवावं लागलं, दोन आमदार बोलवावे लागले. जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी लागली. 18 सभा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. 18 सभा घेऊन सुद्धा माळेगावचा सभासद शरण येत नाही म्हटल्यानंतर प्रचंड महालक्ष्मीचं दर्शन त्यांना द्यावं लागलं. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत चालू ठेवावी लागली. पैशांची पॅकेट देऊन सकाळी 10 हजार, दुपारी 10 हजार सायंकाळी परत 5 हजार असे 25 हजार रुपयापर्यंतचे पैशांचे वाटप झाले, अशी दुर्दैवी वेळ अजित पवार यांच्यावर आली असल्याचे रंजन तावरे. या नेत्याला माझ्या सभासदांनी गुडघ्यावर आणलं, वाड्या वस्त्यावर फिरावं लागल्याचे रंजन तावरे म्हणाले.

….तरीही तुम्हाला 21-0 करता आलं नाही

उभ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. माझ्या स्वाभिमानी सभासदांवर माझा विश्वास आहे, सगळ्या सत्तेचा गैरवापर त्यांनी केला. सगळ्यांना कामाला लावायचे काम अजित पवारांनी केल्याचे रंजन तावरे म्हणाले. माळेगावमध्ये असे काय विशेष होते, राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे सोडून माळेगवाचे चेअरमन व्हायला निघालेत असे रंजन तावरे म्हणाले. तरीही तुम्हाला 21-0 करता आलं नाही असे रंजन तावरे म्हणाले. विकासाच्या नावावर तुम्ही मतं मागा. तुम्हाला सगळ्या निवडणुकांमध्ये पैसे वाटावे लागतात. ही वेळ तुमच्यावर का येते? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

सत्तेचा प्रचंड गैरवापर, दबावतंत्र, प्रचंड लक्ष्मीदर्शन हेच आमच्या पराभवाचं कारण असल्याचे रंजन तावरे म्हणाले. आमचा स्वाभीमान आहे. आण्ही कुठेही मान झुकवणार नाही असेही रंजन तावरे म्हणाले. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढची लढाई लढली जाईल असे रंजन तावरे म्हणाले. आपण जे जाहीर आश्वासन दिले आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही इतर कारखान्यापेक्षा जास्त दर माळेगाव कारखान्याला देणार, तो शब्द पूर्ण करा असे रंजन तावरे म्हणाले.

Related Articles

Back to top button