कर्मयोगी कारखान्यावरील काटा बंद आंदोलन लेखी आश्वासनानंतर माघे
पंधरा दिवसात दिली जाणार थकीत रक्कम

कर्मयोगी कारखान्यावरील काटा बंद आंदोलन लेखी आश्वासनानंतर माघे
पंधरा दिवसात दिली जाणार थकीत रक्कम
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून मागील ऊस गाळप हंगामातील थक्कीत रक्कम न मिळाल्याने मंगळवारी ( दि.२ ) शेतकऱ्यांनी कारखान्याचा सुमारे चार ते पाच तास काटा बंद करून आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेर शेतकऱ्यांना कारखान्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याने सदरील आंदोलन माघे घेण्यात आले.
दरम्यान मंगळवारी शेतकऱ्यांनी थकीत रक्कम देण्याच्या मागणीसाठी कारखान्याचा काटा बंद करून आंदोलन सुरू केले होते.यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी स्वतः उपस्थित रहात कारखाना प्रशासन व शेतकरी यांमध्ये समन्वय साधला तसेच मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.
प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराज लोकरे यांनी मागील २०२०-२१ हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊस बिलाची काही रक्कम देय आहे.ती सर्व देय रक्कम येत्या पंधरा दिवसांमध्ये संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांकडून आंदोलन माघे घेण्यात आले.