दौंड तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान
कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता पत्रकार काम करत आहेत त्याचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे.
दौंड तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान
कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता पत्रकार काम करत आहेत त्याचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे.
यवत वार्ताहर : कोरोनाच्या महामारीने जगभर थैमान घातले असून हि महामारी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह विविध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपापल्या परीने या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी योद्धा म्हणून उभा ठाकला आहे. या कोरोना मुळे अनेकांचे बळी देखील गेले आहेत. मात्र विविध यंत्रणेसह पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता या कोरोनाचे भीषण वास्तव सर्वांसमोर आणण्याचे काम करत आहेत. या कोरोना योध्यांचा सन्मान म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या वतीने आज दि. १३ रोजी दौंड तालुक्यातील पत्रकारांचा चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दिवाळीचे औचित्य साधून मिठाई भेट देण्यात आली.
महेश पासलकर बोलताना म्हणाले कि, जगभर कोरोनाने थैमान घातले असून कोरोना लढ्यात काम करणाऱ्या सर्वांबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन पत्रकारांकडे आशेने पाहिले जात असुन ते या कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणुन काम करत आहे. सर्वांबरोबर त्यांचाही उचीत सन्मान होणे गरजेचे आहे. सध्या जरी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे पासलकर यांनी सांगितले. पासलकर यांच्या वतीने दिपावलीचे औचित्य साधुन सर्व पत्रकारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी दौंड तालुका शिवसेना प्रमुख देविदास दिवेकर, तालुका समन्वयक देविदास धुमाळ, महिला संघटनेच्या छायाताई जगताप, विधानसभा क्षेत्रप्रमुख अजित आटोळे, उपतालुका प्रमुख रमाकांत निवंगुणे, श्रीपती दोरगे, नवनाथ जगताप, मोहन चोरमले, अमोल काळे, चंद्रकांत भणभणे, विभाग प्रमुख विजयसिंह चव्हाण, बाळासाहेब होले, विराज भोसले यांसह आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.