दौंड तालुक्यातील आलेगाव येथील एकाच कुटुंचार जण कोरोना ग्रस्त ,महिलेचा मृत्यू.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी शहरातील रुग्णांची माहिती दिली.
दौंड तालुक्यातील आलेगाव येथील एकाच कुटुंचार जण कोरोना ग्रस्त ,महिलेचा मृत्यू.
दौंड तालुक्यातील आलेगाव येथील एकाच कुटुंबातील चार जण, केडगाव व वरवंड मध्ये प्रत्येकी एक असे सहा जण व दौंड शहरातील चार जणांसह १० कोरोना ची लागण झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी तालुक्यातील, तर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी शहरातील रुग्णांची माहिती दिली.
काल आरोग्य विभागाने कोरोना बाधीतांच्या संपर्कातील ३६ जणांची कोरोना ची तपासणी केली, त्यामध्ये सहा जण पाँझिटिव्ह आले असून उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आलेगाव येथील कुटुंब हे नाशिकला गेले होते, त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांची कोरोना ची तपासणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये एक महिला व तीन पुरूष अशा चार जणांचा समावेश आहे. तालुक्यात पुर्व भागातील मलठण नंतर आलेगाव मध्ये चार रूग्ण वाढल्याने पुर्व भागातील चिंता वाढली आहे.
अशी पडली वरवंड ला एका कोरोना रूग्णांची भर.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आले असता आरोग्य अधिकारांनी त्याची कोरोनाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. संबंधित व्यक्तीने वरवंडचा पत्ता सांगितला आणि त्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला. आधीच वरवंडमध्ये दोन कोरोनाबाधीत असल्याने त्यात या एकाची भर पडली. मात्र वरवंडकरांनी गावात शोध घेतला असता तो वरवंड मधील नसल्याचे समोर आले. मात्र वरवंड चा पत्ता असल्याने वरवंड च्या नावावर एक रूग्णांची सरकारी दप्तरी नोंद पडली आहे.दरम्यान शहरांमध्ये नव्याने चार जण कोरोनाबाधित आढळल्याने दौंड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 वर पोचली आहे, यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.