दौंड तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून सन्मान
आज आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
दौंड तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून सन्मान
आज आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
यवत : बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील राहू ता.दौंड आमदार निवास येथे आमदार अॕड.राहुलदादा कुल व पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात गेली ७/८ महिनेपासून दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात वाडीवस्तीवर जाऊन ज्यांनी शेतकऱ्यांसाठी पशुसेवा दिली अशा खाजगी ५० डॉक्टरांना आमदार राहुलदादांच्या वतिने व पोलिस फ्रेन्डस च्या वतिने कोवीडयोध्दा सन्मान पत्र देवून आज आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थिती मध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, दौंड तालुका पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असो.अध्यक्ष सचिन बाळासाहेब गुंड, उंडवडी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडधे, डॉ.सुदर्शन खळदकर सदस्य पशुवैद्यकीय संघ महाराष्ट्र राज्य,डॉ.संतोष बडेकर जिल्हाध्यक्ष पशुवैद्यकीय संघ पुणे जिल्हा,डॉ.राहुल चव्हाण तालुकाअध्यक्ष दौंड पशुवैद्यकीय संघ,सरपंच दिलिप देशमुख सर राहू, मराठा महासंघ जिल्हा सचिव मयुरआबा सोळसकर,मराठा महासंघ विद्यार्थी आघाडी माजी अध्यक्ष सुरज चोरगे,व तालुक्यातील डॉक्टर,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम सुत्रसंचालन मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुरआबा सोळसकर यांनी केले तर आभार अनिल गायकवाड दौंड तालुका रिप्बलिकन पार्टी यांनी मानले.