दौंड तालुक्यातील गिरीम गावातील; विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास चौघांवर गुन्हा दाखल..!!
पती,सासू,सासरे व दीर यांचा समावेश आहे.
दौंड तालुक्यातील गिरीम गावातील; विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास चौघांवर गुन्हा दाखल..!!
पती,सासू,सासरे व दीर यांचा समावेश आहे.
क्राईम ;बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील गिरिम गावातील विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०६,४९८ (अ),३२३,५०६ (३४)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुर्वा हिच्या वडीलांना दोन वर्षापुर्वी दाखल केलेला गुन्हा माघारी घेण्यास तुझ्या वडीलांना सांग असे म्हणून तिचा शाररीक व मानसिंग छळ केल्याने या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी (दि.11) गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हणटंले आहे. दरम्यान पुर्वा हिला दौंड येथील खाजगी रूग्णालयाच उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॅाक्टरांनी घोषीत केले.
विठ्ठल दादा फुलारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असुन यामध्ये पती,सासू,सासरे व दीर यांचा समावेश आहे.जीवन माणिक कोळपे,माणिक राजाराम कोळपे,लता माणिक कोळपे मनोज माणिक कोळपे सर्वजण (रा.मदनेवस्ती,गिरीम,ता.दौंड, जि.पुणे )अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पुर्वा हिचे वडील विश्वनाथ दादा फुलारी (गिरीम ता. दौंड जि. पुणे) यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पती जीवन माणिक उर्फ जयसिंग कोळपे, सासरे माणिक उर्फ जयसिंग राजाराम कोळपे, सासू लता माणिक उर्फ जयसिंग कोळपे, दिर मनोज माणिक उर्फ जयसिंग कोळपे (सर्व रा. मदनेवस्ती गिरीम ता. दौंड जि. पुणे) फिर्य़ाद दिल्याने शाररीक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे फिर्यादी यांनी मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात दौंड पोलिसात तक्रार केली.पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.