दौंड

दौंड तालुक्यातील शिरापूर येथे अवैध वाळू उपशाविरोधात मोठी कारवाई

अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील शिरापूर येथे अवैध वाळू उपशाविरोधात मोठी कारवाई

अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र

दौंड तालुक्यातील शिरापूर येथे अवैध वाळू उपशाविरोधात पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून वाळूचोरीसाठी वापरल्या जाणार्या १७ बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील अकरा सराईत वाळूचोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिरापूर येथील भीमा नदी पात्रात दौंड उपविभागाचे पोलिस उप अधीक्षक राहुल धस यांनी ही कारवाई केली. महसूल खात्याच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे नदी पात्रातून अहोरात्र बेसुमार वाळूचोरी केली जात असल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ कोटी ३६ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यापैकी ९ फायबर बोटी व ८ सक्शन यंत्र असलेल्या बोटी स्फोटाने नष्ट करण्यात आल्या. तर एक जेसीबी यंत्र जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button