दौंड

दौंड व वारुळवाडी नारायणगाव येथे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२,000/- रुपयाला एक असे विकी करीत असताना मिळून आले.

दौंड व वारुळवाडी नारायणगाव येथे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यात :पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२,000/- रुपयाला एक असे विकी करीत असताना मिळून आले.

दौंड; बारामती वार्तापत्र रिपोर्ट

मा.पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दौंड व वारुळवाडी नारायणगाव ता.जुन्नर अशा दोन ठिकाणी रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विकी करणारे तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये १,१९,७६९/- चा माल जप्त केलेला आहे.

दौंड गावचे हदीत हुतात्मा चौक, गणपती मंदिरासमोर ता.दौंड जि.पुणे येथे इसम नामे १) अक्षय राजेश सोनवणे वय २४ वर्षे रा.गांधी चौक, विठ्ठल मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे २)सुरज संजय साबळे वय २३ वर्षे रा. शालिमार चौक, स्वामी समर्थ मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे हे दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२,000/- रुपयाला एक असे विकी करीत असताना मिळून आले.

त्यांचे ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु. ७,८७९/-, दोन मोबाईल कि.रु.२०,000/- व होंडा अॅक्टीव्हा दुचाकी किं.रु.७०,000/- असे एकूण ९७,८७९/- रु. चा माल जप्त करण्यात आला. नारायणगावजवळील मौजे वारुळवाडी ता.जुन्नर राजाराम सबनिस विदयालयासमोर ता.जुन्नर जि.पुणे येथे इसम नामे रोहन शेखर गणेशकर वय २९ वर्षे रा.वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर जि.पुणे येथे ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ४५,०००/- रु. रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आला. ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु.११,८९०/- व मोबाईल कि.रु.१०,000/- सह एकूण २१,८९०/-रु.चा माल जप्त करण्यात आला. कोविड-१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशीररित्या, अवैध व गैर मार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वत:चे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम. आर.पी. पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना व विकत घेताना मिळून आलेने दोघे आरोपींवर दौंड पोलीस स्टेशनला व एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनला औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी), जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७(१)(ए)(ii), औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०
चे कलम १८(सी), २७(बी)(ii),२८,२२(१)(cca),२२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. फौ. शब्बीर पठाण, पोहवा.महेश गायकवाड, पोहवा.निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा.सुभाष राऊत, पोना. गुरु गायकवाड, पोहवा.मुकेश कदम, पोहवा. दत्ता तांबे, पोहवा.सागर चंद्रशेखर, पोहवा. काशिनाथ राजापुरे,पोकॉ.दगडू विरकर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!