दौंड शहरात एका दिवसात पंधरा कोरोना पोझिटिव्ह.
काळजी घेण्याचे प्रशासन चे आवाहन.
बारामती:वृत्तपत्र दौड शहरात एका दिवसात 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासन ने काळजी घेण्याची आव्हान केले आहे.
दौंड शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता झपाट्याने वाढत चालली असून आज एका दिवसात दौंड शहरात वेगवेगळ्या भागात पंधरा कोरोना बाधित रुग्ण व मेरगळवाडी येथे एक रुग्ण आढळून आल्यामुळे दौंडकरांची चिंता वाढली आहे.
दौंड शहराच्या काही ठराविक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते.आता कोरोना विषाणूने आपले हात पसरले असून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.
आज दौंड शहरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३१ संशयित नागरिकाचे घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यापैकी सोळा जणांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये दौंड शहरातील पंधरा जणांचा समावेश असून एका मेरगळवाडी येथील नागरिकाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
गेल्या तीन दिवसामध्ये दौंड शहरांत २३ रुग्ण आढळून आल्यामुळे दौंड हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे.दौंड शहरात आत्तापर्यंत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.