धक्कादायक: काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट

अद्याप मृत्यूंचा आकडा हा अस्पष्ट आहे अशी माहिती अमेरिकेचे सार्वजनिक व्यवहार संरक्षण विभागाचे सहाय्यक यांनी दिली आहे.

धक्कादायक: काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट

अद्याप मृत्यूंचा आकडा हा अस्पष्ट आहे अशी माहिती अमेरिकेचे सार्वजनिक व्यवहार संरक्षण विभागाचे सहाय्यक यांनी दिली आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

अनेक लोक या स्फोटात जखमी झाले असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानबद्दल बोलताना सांगितलं की, भारताचं पहिलं प्राधान्य तिथे अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका हे आहे.

भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमित विमान (Flights to Kabul) उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी सोडलं. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील.

Two large explosions outside Kabul airport

धक्कादायक: काबुल विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट

काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ स्फोट झाल्यामुळे अज्ञात लोकांचे बळी गेले आहेत, ”असे ट्विट अमेरिकेच्या सार्वजनिक व्यवहार विभागाचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी केले आहे.

पेंटागॉनचे म्हणणे आहे की, काबूल विमानतळाच्या बाहेर स्फोट झाला. प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, स्फोटात झालेल्या जीवितहानीबाबत तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. हजारो अफगाणी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसांपासून विमानतळावर जमले आहेत.

अफगाणिस्तानच्या तालिबानांच्या ताब्यातून हजारो लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांनी मोठ्या विमानसेवेच्या कमी दिवसांमध्ये तेथे संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. तसेच तालिबानी हे आत्मघाती बॉम्बस्फोट करतील यामुळे अनेक देशांनी काल नागरिकांना विमानतळावर जाण्याचे टाळवे असे आवाहन केले होते.

Related Articles

Back to top button