धक्कादायक घटना; बारामती तालुक्यातील अंजनगा अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना, चक्क सावित्रीबाई फुले यांचा फोटो ठेवला आणि जयंती साजरी
संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
धक्कादायक घटना; बारामती तालुक्यातील अंजनगा अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना, चक्क सावित्रीबाई फुले यांचा फोटो ठेवला आणि जयंती साजरी
संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
बारामती वार्तापत्र
अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३१ मे रोजी भारतामध्ये मोठ्या दिमाखात साजरी केली जाते.अहिल्याबाई होळकर यांच्या बाबतीत शाळेत मुलांना धडे देखील आहेत.तरी देखील शिक्षकांना नेमका कशाचा विसर का पडला आहे.? त्यांना अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांच्यातील फरकच कळत का नाही.याच्या पेक्षा दुर्भाग्याची गोष्ट नाही? शिक्षकांकडून काय आदर्श घ्यावा विद्यार्थ्यांनी ? आज ३१मे रोजी संपूर्ण भारतभर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खूप दिमाखात साजरी करण्यात आला परंतु अंजनगाव या ठिकाणी सोमेश्वर हायस्कूल येते या जयंतीला कुठेतरी गालबोट लागल्याचे दिसून आले.
यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक एम.डी. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही गोष्ट मान्य केली व शिक्षकांकडून हा नकळत प्रकार घडल्याचे सांगत त्यांनी लागलीच आम्ही दुरुस्ती केल्याचे सांगितले. मात्र या धक्कादायक व गंभीर प्रकाराची दखल घेत सोमेश्वर कारखान्याच्या शिक्षण संस्थेचे सचिवांनी आज अंजनगावचे विद्यालय गाठले.
हा संतापजनक प्रकार असून अंजनगाव येथील नागरिकांकडून शिक्षक वर्गाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आपण तसे इतिहास पहायला गेले तर सावित्रीबाई फुले ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात
महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाच्या प्राचार्यांनी व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यां पुढे व महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.खरं सांगायचं तर शिक्षकांना अजून सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या मधील फरकच कळत नसल्याने खुप मोठी शोकांतिका आहे.
अर्थात शाळेच्या मुख्याध्यापकाला आणि शिक्षकांना जर सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यातील फरक कळत नसेल तर या शिक्षकांकडून व्यवस्थित इतिहास आणि भूगोल काय शिकवला जाईल.. कपाळ?
या प्रकाराचा आगडोंब उसळण्या अगोदर संबंधित शिक्षकांवर काय निर्णय घेणार.? गटशिक्षणाधिकारी काय निर्णय घेणार.? सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ काय निर्णय घेणार? कठोर कारवाई करण्याची गरज आहे.