धक्कादायक घटना; लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं, हळदी समारंभादरम्यान विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

धक्कादायक घटना; लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं, हळदी समारंभादरम्यान विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
प्रतिनिधी
लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं. या घटनेत एका विहिरीत अनेक महिला आणि मुली कोसळल्या. या घटनेत 13 महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथील असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या. या घटनेत आतापर्यंत अकार महिलांचा मृत्यू झाला आहे.
जीव वाचवण्यासाठी महिलांची धडपड
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या. एकूण 13 महिला या विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता. तर पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 11 महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर दोन महिलांचा जीव वाचला आहे. या दोन महिला गंभीर असून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.
या घटनेचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून समजतं की लोक शिडी टाकून विहिरीत उतरले आणि मदतकार्य सुरू केलं. रात्र असल्यानं बचावकार्यात अडचणी येत होत्या, टॉर्चच्या उजेडात काम करावं लागत होतं.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताच्या या घटनेबाबत शोक व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलं की, “UPCM श्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडून झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.