धक्कादायक! ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’,असं म्हणत एका तरुणाची आत्महत्या
सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही.
धक्कादायक! ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’,असं म्हणत एका तरुणाची आत्महत्या
सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही.
पंढरपूर :प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे.
‘शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज ओव्हर’ असे म्हणत पंढरपूरात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज यादव असे या तरुणाचे नाव आहे. सूरजने विष प्राशन करताना व्हिडिओ काढला होता. तो आता व्हायरल झाला आहे.
आपलं आयुष्य इथ पर्यंतच होत. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकऱ्याच्या कधी नादाला लागत नाही. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही.
एका अज्ञात स्थळी बसून सूरजने सेल्फी व्हिडिओ शूट करून विषाची बाटली दाताने उघडली. त्यानंतर त्याने विष प्राशन करून बाटली फेकून दिली. सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.