धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यावर पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत.
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यावर पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत.
क्राईम;बारामती वार्तापत्र
पत्नीशी अनैसर्गिक संबंध ठेवत तिचा शारीरिक छळ व फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात
कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली, त्यानुसार या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचा विवाह ३१ मार्च २०१८ रोजी आळंदी येथे झाला. त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यापासून तक्रारदार महिलेला पतीने कधीही मूळगावी नेले नाही. तसेच छोट्या-मोठ्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. हे लग्न होण्यापूर्वी सुद्धा त्याचे पहिले लग्न झाल्याची माहिती तक्रारदार महिलेला समजली. याबाबत तक्रारदार महिलेने पतीला विचारणा केल्यावर तिला दमदाटी केली. तसेच तक्रारदार पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच तिच्या व मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत, अशी फिर्याद देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यावर ४९८ अ, ५०४, ५०६ व सदर महिलेने पुरवणी जबाब दिल्याने भादवि कलम ३७७ प्रमाणे कलम वाढ करून गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.