धक्कादायक प्रकार ; भेटण्यास नकार दिल्याने विवाहितेचा नग्न फोटोचे व्हॉट्सअॅप स्टेटसला,बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा
धक्कादायक प्रकार ; भेटण्यास नकार दिल्याने विवाहितेचा नग्न फोटोचे व्हॉट्सअॅप स्टेटसला,बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील एक विवाहीत महिलेचे पैठण तालुक्यातील एक व्यक्तीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करताना त्याचे व्हिडीओ, फोटो काढले, तिने भेटण्यास नकार दिला असता हे व्हिडीओ व फोटो व्हाॅट्सअप स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला.
ही महिला बारामती तालुक्यातील सांगवी येथील आहे. याप्रकरणी लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजनगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळीच लक्ष्मणने दोघांचे नग्न फोटो महिलेला पाठवले. तसेच, ‘तु जर मला भेटायला आली नाहीस, तर हे फोटो तुझ्या पतीला व भावाला पाठवीन,’ अशी धमकी दिली. महिलेने ही बाब तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर काही वेळातच लक्ष्मणने तिच्यासोबतचा व्हिडीओ महिलेला पाठवला. तरी देखील महिलेने दाद दिली नाही. मग 27 मे ला लक्ष्मणने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले. याप्रकरणी महिलेने स्क्रीनशॉट काढत लक्ष्मण वीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.