शैक्षणिक

मएसो च्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची आश्वासनपूर्ती

एक लाख रुपये एकत्रित करून २५ बेंच प्रशालेस भेट

मएसो च्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची आश्वासनपूर्ती

एक लाख रुपये एकत्रित करून २५ बेंच प्रशालेस भेट

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयात १९६७ व १९६८ च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा एप्रिल २०२५ मध्ये उत्साहात संपन्न झाला होता.

यासाठी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये पर्यंत वस्तू स्वरूपात प्रशालेस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये एकत्रित करून २५ बेंच प्रशालेस भेट देऊन आपली आश्वासनपूर्तता केली. तसेच यापुढेही प्रशालेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

त्याचा समर्पण सोहळा शाला समिती सदस्य डॉ. झिरमिटे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीकांत सिकची यांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांचे बेंच प्रशालेस देण्याचे जाहीर केले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमासाठी समन्वयक श्री पुरुषोत्तम कुलकर्णी,पर्यवेक्षक शेखर जाधव, तसेच प्रकाश मोने, रवींद्र मुथा,अजित शहा(वडूजकर),भारत दोशी (खटावकर), डॉ. जयप्रकाश शहा आदी मान्यवर माजी विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यानिमित्ताने शाला समिती अध्यक्ष मा.अजय पुरोहित, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीव देशपांडे,फणेंद्र गुजर, पर्यवेक्षक दिलीप पाटील, जयश्री शिंदे आदींनी माजी विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले.

Back to top button