स्थानिक

धक्कादायक ! बारामतीत सुरक्षा साधनांशिवाय कर्मचाऱ्यांना गटारात उतरवले; मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर कारवाईची मागणी

‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि त्यांच्या पुनर्वसन कायदा २०१३’

धक्कादायक ! बारामतीत सुरक्षा साधनांशिवाय कर्मचाऱ्यांना गटारात उतरवले; मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर कारवाईची मागणी

‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि त्यांच्या पुनर्वसन कायदा २०१३’

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कामांदरम्यान कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय ड्रेनेजमध्ये उतरवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यामुळे संतापाची लाट उसळली आहे. ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि त्यांच्या पुनर्वसन कायदा २०१३’ चे उल्लंघन झाल्याचा आरोप करत मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेच्या ड्रेनेज साफसफाईच्या कामात सफाई कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन किट, मास्क, हातमोजे किंवा गमबूट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने न देता थेट गटारात उतरवण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे.

कायद्यानुसार, अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून मैला साफ करून घेणे किंवा गटारात उतरवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. संबंधित अधिकाऱ्यांवर कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ FIR नोंदवून कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. तसेच नगरपरिषदेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांची तातडीने तपासणी (सुरक्षा ऑडिट) करण्याची मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button