क्राईम रिपोर्ट

धक्कादायक; वडिलांकडून मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल

“पप्पा.. पप्पा.. नाही.. मला मारायचं नाही”

धक्कादायक; वडिलांकडून मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल

“पप्पा.. पप्पा.. नाही.. मला मारायचं नाही”

प्रतिनिधी

वडिलांनी आपल्या पोटच्या पोराला अमानुष मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या चिमुकल्याची “पप्पा… पप्पा” अशी आर्त साद ऐकून आणि त्याची अवस्था पाहून कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल, मात्र या बापाचं मन काही कमकुवत झाल्याचं दिसत नाही.

वडिलांकडून मुलाला अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. वडील मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये

अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच लहान मुलगा “पप्पा… पप्पा” असं ओरडत धाय मोकलून रडताना दिसत आहे. “पप्पा.. पप्पा.. नाही.. मला मारायचं नाही” असं चिमुकला जीवाच्या आकांताने ओरडत असतानाही बाप त्याला लाकडी दांडक्याने चोपत असल्याचं दिसतं. मुलगा “नाही.. नाही” असं भोकांड पसरत म्हणत असतानाही बाप त्याच्यावर लाकडी दांड्याने प्रहार करतच सुटला आहे.

सुरुवातीला हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठला आहे, याविषयी माहिती मिळत नव्हती. ही मारहाण नेमकी कुठल्या कारणावरुन केली जात आहे, याचाही अंदाज लावता येत नाही. हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला आहे, तेही समजत नसलं, तरी पार्श्वभूमीवर एका लहान मुलीचा आवाज येत असून ती ‘लड्डू… गप्प बस’ असं म्हणताना ऐकू येते.

लहान मुलीच्या हुंदक्यांचा आवाज

काही वेळाने ती ‘पप्पा जाऊ द्या पप्पा’ असंही म्हणते, मात्र वडील काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मारता-मारता बापाच्या हातातून ती लाकडी काठी पडते, तसा चिमुकला एका कोपऱ्यात जातो. आपल्या अंगापाशी उशी धरतो, तरीही बाप त्याला खेचून समोर आणतो. यावेळी पार्श्वभूमीवर एका लहान मुलीच्या हुंदक्यांचा आवाज येतो आहे.

आता हा व्हिडीओ नाशिकमधील असल्याचं समोर झालं आहे. मारहाण करणाऱ्या नराधम बापाचं नाव स्पष्ट झालेलं नाही. परंतु सर्वच स्तरातून या क्रूर पित्याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे या लेकराला अमानुष मारहाण करणाऱ्या पाषाणहृदयी बापावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Related Articles

Back to top button