इंदापूर

धक्कादायक ! शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने पाच टन मासे मृत्युमुखी

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

धक्कादायक ! शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने पाच टन मासे मृत्युमुखी

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील शेलार पट्टा येथील शेतकरी संजय शेलार ( वय ५२ वर्षे ) रा.पळसदेव यांच्या शेततळ्यात अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी औषधामुळे तब्बल पाच टन मासे मृत्युमुखी पडल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेलार पट्टा परिसरात संजय शेलार यांच्या शेतात २०० बाय १०० चे शेततळे आहे. शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी सुमारे ३० हजार रूपचंद जातीचे बीज सोडण्यात आले होते.रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले असून सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरील प्रकार समोर आला आहे.यामध्ये शेतकरी शेलार यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Back to top button