मुंबई

धक्कादायक! सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

सीरमच्या आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत.

सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबईःबारामती वार्तापत्र

सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.

कोव्हिशील्ड लसीची बिल्डिंग आगीच्या स्थळापासून लांब आहे, त्यामुळे कोव्हिशिल्डच्या लसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे.

Back to top button