धनंजय मुंडेंनी बारामतीत पवार कुटुंबीयांसह साजरा केला वाढदिवस.
शरद पवार आमचे आधारवड.
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचा व्हिडिओ.
शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खास.दार सुप्रिया सुळे यांनी केक आणला, जो पवारसाहेबांनी भरवला याचा आपल्याला आनंद आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले धनंजय मुंडे?
करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळेताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा आधारवड कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई असाच आशीर्वाद असूद्या